धक्कादायक: पुण्यात जुलूसमध्ये झेंडा फडकवताना तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
schedule22 Sep 24 person by visibility 304 categoryगुन्हे
पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोन तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. काही क्षणातच जमिनीवर कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मृत आणि जखमी तरुणाचे नाव अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील आनंद पार्क येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये अनेकजण सहभागी झाले होते.
यातील दोन तरुण साऊंड सिस्टिम वर चढून झेंडा फडकवत होते. अचानक झेंड्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. डीजेवर चढलेल्या दोन्ही तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. यातील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. घडलेल्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होता आहे.