एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पार
schedule14 Jun 26 person by visibility 167 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा - 2026 ही परीक्षा रविवार 14 जुन, रोजी सकाळी 11ते 12 या वेळेत कोल्हापूर जिल्हयात सुरळीतरित्या पार पडली .
जिल्हातील कोपार्डे, सांगरूळ कुडीत्रे,कागल,इचलकरंजी, वाठार,वडगांव,अतिग्रे आदी ठिकाणासह कोल्हापूर शहरातील महाविद्यालये व हायस्कूल अशा 62 उपकेंद्रावर ही लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेकरीता जिल्ह्यात एकूण 18985 परिक्षार्थी बसले होते यापैकी 15735 विद्यार्थी उपस्थित तर 3250 विद्यार्थी अनुपस्थित होते .
जिल्ह्यात ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख ,निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक,राज्यकर उपायुक्त जीएसटी भवन कोल्हापूर तथा विशेष निरीक्षक ,अभिरक्षक-1, अतिरिक्त अभिरक्षक-1, सहाय्यक अभिरक्षक-1 , परीक्षा नियंत्रक सहाय्यक-1 यांची प्रामुख्याने नियुक्ती करण्यात आली होती . तर परीक्षा कामकाजाकरीता 16 समन्वय अधिकारी ,921 समवेक्षक ,16 समन्वय सहाय्यक कर्मचारी ,133 लिपीक, 3 भरारी पथक अधिकारी, 62 केटरटेकर, 3 भरारी पथक सहाय्यक कर्मचारी, 502 शिपाई कर्मचारी , 62 उपकेंद्रप्रमुख , 15 जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, 277 पर्यवेक्षक आदी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते .
ही परिक्षा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . तसेच परिक्षा केंद्रावर प्रत्येक परिक्षार्थीचे बायोमेट्रीक पडताळणी व फ्रिस्किंग करण्यात आली . त्याचबरोबर कोल्हापूर शहरामधील 62 केंद्रांवरील प्रत्येक खोलीमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते . या परिक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार अथवा अनियमितता घडली नसल्याची माहिती. निवासी उप जिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक गजानन गुरव यांनी पत्रकाद्वारे दिली .