तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये बेपत्ता युवकाचा सांगाडा
schedule20 Sep 24 person by visibility 391 categoryगुन्हे
कोल्हापूर : तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये आज शुक्रवारी कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील कृष्णात शिवाजी मांडरेकर (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेहाचा सांगाडा आढळून आला. ते १५ ऑगस्ट पासून बेपत्ता होते. नातेवाईकांनी कपडयांवरून ओळख पटवली असुन सापडलेला सांगाडा कृष्णात मांडरेकर याचा असल्याची खात्री केली आहे.
तुळशी धरण नर्सरीमध्ये आज दिगंबर दत्तात्रय तामकर हे गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यांना तेथे सांगाडा आढळून आला. त्यांनी तात्काळ राधानगरी पोलीसांशी संपर्क साधुन या विषयीची माहिती दिली.
राधानगरी पोलीसांनी केलेल्या तपासात तो सांगाडा कांबळवाडी येथील बेपत्ता कृष्णात शिवाजी मांडरेकर याचा असल्याची माहिती दिली.