स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे उद्या विद्यापीठात उद्घाटन
schedule01 Jan 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग विभागाच्या वतीने आयोजित स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक आनंद पेंटर यांच्या हस्ते शुक्रवार दि. 2 रोजी सकाळी साडेदहा वाजता होत आहे.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन इमारतीत हा फेस्टिव्हल होईल. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. फेस्टिव्हल शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल.
स्पार्क फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत दोन दिवसांच्या पर्यावरणविषयक शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेन्ट्रीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला किर्लोस्कर ऑईल इंजिनचे रमेश चव्हाण आणि हरिष सायवे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लक्ष्मी फाऊंडेशनचे विनायक देसाई आणि शरद आजगेकर यांची विशेष उपस्थित असेल. स्पर्धेसाठी 25 दिग्दर्शकांनी फिल्म सादर केल्या आहेत. राज्याच्या विविध भागातून फिल्म आल्या आहेत. सर्व फिल्मचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तज्ज्ञ परीक्षक फिल्मचे मूल्यमापन करतील. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या फेस्टिव्हलचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.





