के.एम.सी. महाविद्यालयात मतदार जनजागृती रांगोळी स्पर्धा उत्साहात
schedule01 Jan 26 person by visibility 58 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयात ''मतदार जनजागृती'' अभियानांतर्गत महिला सचेतना समितीच्यावतीने गुरुवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ९.०० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेदरम्यान महाविद्यालयाचा परिसर तिरंगामय वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थिनींनी मतदार जागृती, लोकशाही मूल्ये व मतदानाचे महत्त्व या विषयांवर विविध संकल्पनात्मक रांगोळ्या साकारत जनजागृतीचा संदेश दिला.
या स्पर्धेत वैष्णवी तामचेकर हिने प्रथम क्रमांक, सलिका नाईक हिने द्वितीय क्रमांक तर सानिका कोरवी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पूजा थोरात व शालन कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे, डॉ. एस. पी. कांबळे, ग्रंथपाल रवींद्र मांगले, प्रा.ए.डी.मुडे, डॉ. अमित रेडेकर, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. जे. एम. शिवणकर, डॉ. वनिता शिंदे, डॉ.छाया माळी, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. मयुरी तिकोटे यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.





