SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या भाग्यश्री खाडे हिचा ‘इंडिया इटमे टेक्नीकल अ‍ॅवॉर्डस २०२५’ ने सन्मानकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : अण्णांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी : सत्यजित जाधवमुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँगरुम व चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणीकेंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरीनूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाएसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीमअमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील तीन एकर जमीनडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इनोव्हर्स २.० राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमडॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांना दुहेरी आंतरराष्ट्रीय सन्मानमतदार जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, मानवी साखळी

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : अण्णांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी : सत्यजित जाधव

schedule01 Jan 26 person by visibility 109 categoryराजकीय

कोल्हापूर  : प्रभाग क्रमांक 11 मध्ये  कार्य करायचे आहेत. जे  व्हिजन आहे ते अण्णांचे आहे. अण्णांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्याचे अपूर्ण राहिले कार्य, व्हिजन मला पूर्ण करायचे आहे हा भाग विकसित करायचा आहे. मला नशिबाने  प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. अण्णांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पुन्हा तो प्रभाग मला मिळालेला आहे. हा  प्रभाग परिचित असल्यामुळे सर्वांची साथ लाभेल, अशी भावना प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सत्यजित  जाधव म्हणाले, 
मी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीत रिंगणात उतरणार होतो. पण महायुतीच्या जागेच्या वाटाघाटीमध्ये मला एक पाऊल मागे घ्यावे लागले. ज्यावेळी जयश्रीताई जाधव या प्रथम  नगरसेवक झाल्या त्या भाजपच्या तिकिटावरती लढल्या होत्या.  यामुळे या प्रभागासाठी भाजपचा आग्रह होता. शेवटी महायुती असल्यामुळे आम्ही त्यास मान्यता दिली.  तातडीने पालकमंत्री  प्रकाश अबिटकर व आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रभाग बदलून दिला. हा निर्णय महायुती म्हणून घ्यावा लागला.

 सत्यजित जाधव म्हणाले पण नशिबाने जो हा  प्रभाग  मला मिळालेला आहे. आमचे जुने  घर याच प्रभागामध्ये आहे.  माझे चुलते संभाजी जाधव हे प्रथमच या प्रभागातून नगरसेवक झाले होते. यामुळे लोकांचा कल आणि प्रतिसाद आणि अण्णांचे कार्य, माजी आमदार जयश्री जाधव यांनी केलेले कार्य यामुळे लोक माझ्या पाठीमागे उभे राहतील अशी मला खात्री आहे.

तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये ओमकार संभाजी जाधव हे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पूर्वी संभाजी जाधव हे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांचे चिरंजीव ओंकार संभाजी जाधव  प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यालाही साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes