कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद
schedule31 Mar 25 person by visibility 233 categoryराज्य

कोल्हापूर : गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा, या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राबविला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गुढी पाडव्यादिवशी दाखलपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अगत्यपूर्वक शाळेत आमंत्रित करावे, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करावे तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरुन त्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करण्याबाबत कळविण्यात आले होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढीपाडवा – शाळा प्रवेश वाढवा' या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील 6 वर्षे पूर्ण वयोगटातील (दाखलपात्र) 26 हजार 182 बालकांपैकी 15 हजार 737 बालकांचा (60 टक्के पेक्षा जास्त) प्रवेश गुढी पाडव्यादिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या वि. मं. कणेरीवाडी, वि. मं. हसूरदुमाला, वि. मं.कुरुंदवाड नं.3, मराठी वि.मं.खिद्रापूर, वि. मं. म्हाकवे, वि.मं.सोनाळी, वि.मं.बोरवडे, वि.मं.शिनोळी, उर्दू वि.मं. चंदगड, केंद्रशाळा कोलोली, वि.मं.जाखले, वि.मं.खानापूर अशा अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांची गर्दी उसळली असून काही ठिकाणी तर प्रवेशासाठी पालकांच्या रांगाला लागल्या होत्या.
'गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झालेली बालके पुढीलप्रमाणे
तालुका- आजरा, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 699, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 577 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 82.55 अशी आहे.
तालुका- भुदरगड, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 1153 , पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 837 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 72.59 अशी आहे.
तालुका- चंदगड, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 1612, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1231 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 76.36 अशी आहे.
तालुका- गडहिंग्लज, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 1456, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 873 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 59.96 अशी आहे.
तालुका- गगनबावडा, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 396, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 358 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 90.40 अशी आहे.
तालुका-हातकणंगले, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 4784, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1811 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 37.86अशी आहे.
तालुका- कागल, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 2344, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1518 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 64.76 अशी आहे.
तालुका- करवीर, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 4793, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 2512 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 52.41 अशी आहे.
तालुका-पन्हाळा , 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 2423, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1563 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 64.51 अशी आहे.
तालुका- राधानगरी, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 1770, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1393 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 78.70 अशी आहे.
तालुका- शाहुवाडी, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 1436, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1171 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 81.55 अशी आहे.
तालुका- शिरोळ, 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 3316, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 1893 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 57.09 अशी आहे.
एकूण 6+ वयोगटातील (दाखलपात्र) संख्या 26182, पैकी गुढीपाडव्या दिवशी दाखल विद्यार्थी संख्या 15737 दाखल टक्केवारी (दाखलपात्र संख्येशी) 60.11 अशी आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा 'गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम राज्यात आदर्शवत असून इतर जिल्ह्यांमध्येही त्याचे अनुकरण केले जात आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.