SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत सादर झाले विधेयक

schedule09 Dec 25 person by visibility 507 categoryदेश

कोल्हापूर  : नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक सादर केले. त्यानुसार आता देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी मुलभूत पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक मांडले. देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला समान क्रिडा हक्क मिळावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासह सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास व्हावा, यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करावे, हे विधेयक मंजूर करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी मांडलेल्या या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल. 

मैदान, खेळाची साधने, प्रशिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणारे हे विधेयक आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर, देशभरातून अनेक खेळाडू घडतील आणि क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा जागतिक पातळीवर वाढेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes