सुनीलकुमार सरनाईक यांचे निधन
schedule15 Dec 25 person by visibility 90 categoryसामाजिक
कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांचे दुःखद निधन झाले. ते करवीर काशी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष होते.
सुनीलकुमार सरनाईक यांनी गेली चार दशके पत्रकारिता, संपादन आणि लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. दैनिक सकाळ, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी, तरुण भारत, सत्यवादी आदी नामांकित वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्यपूर्ण लेखन प्रसिद्ध झाले होते.
पत्रकारितेबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. जोतिबा : परिचय व नित्यक्रम, माणसं मनातली, रोखठोक, जोतिबा : एक लोकदैवत, ग्राहक जागर, स्मरणगाथा यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले.





