रेकॉर्डवरील आरोपीसह दोन अल्पवयीन बालकांकडून चोरीचा ट्रॅक्टर जप्त
schedule20 Sep 24 person by visibility 843 categoryगुन्हे
कोल्हापूर : रेकॉर्डवरील एका आरोपीसह दोन अल्पवयीन बालकांना पकडण्यात आले त्यांचेकडून अर्जुन 555 कंपनीचा 6,50,000/- रुपये किंमतीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कारवाई केली. पवन देसाई, (रा. कडगांव, ता. भुदरगड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस अंमलदार राजू कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार पवन देसाई, रा. कडगांव, ता. भुदरगड याने व त्याचे साथीदार हे चोरीचा ट्रॅक्टर घेवून विक्री करणेकरीता गारगोटी ते आजरा जाणारे रोडवर नवले, ता. भुदरगड गांवचे हद्दीत येणार आहेत. या मिळाले माहिती नुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रशांत कांबळे, राजू कांबळे, योगेश गोसावी व सुशिल पाटील यांचे तपास पथकाने दि. 19 सप्टेंबर रोजी सायंकाळचे वेळेस गारगोटी ते आजरा जाणारे रोडवर नवले, ता. भुदरगड गांवचे हद्दीत सापळा लावून आरोपी पवन प्रकाश देसाई, व.व.28, रा. कडगांव, कासारगल्ली, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यास व त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना त्यांचे कब्जातील 6,50,000/- रुपये किंमतीचे अर्जुन 555 कंपनीचे ट्रॅक्टरसह पकडले. त्यांना ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे कब्जात मिळालेला ट्रॅक्टर हा आज सुमारे चार दिवसापुर्वी रात्रौचे वेळी बश्याचा मोळा व सुक्याची वाडी ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथून चोरला असलेचे सांगीतले.
सदरबाबत खात्री केली असता आरोपीचे कब्जात मिळालेला अर्जुन 555 कंपनीचा ट्रॅक्टर चोरीस गेले बाबत भुदरगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. आरोपी पवन देसाई व दोन ज्युवेनाईल बालकांना त्यांचे कब्जात मिळालेले चोरीचे ट्रॅक्टरसह भुदरगड पोलीस ठाणे येथे हजर केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रशांत कांबळे, राजू कांबळे, योगेश गोसावी, सुशिल पाटील, भुदरगड पोलीस ठाणेकडील पोलीस अमंलदार महादेव मगदूम, सागर साबणे, परीट तसेच सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखळे यांनी केली आहे.