SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शैक्षणिक गुणवत्तेत कोरे डिप्लोमाची पुन्हा एकदा बाजी; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 'अतिशय उत्कृष्ट' मानांकनपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरूकोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईकोल्हापुरात मोठी कारवाई: १५ पोलीस ठाण्यांमधील ५१५ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट!कोल्हापुरात एलसीबीची मोठी कारवाई: ४ सराईत चोरे जेरबंद, १० गुन्हे उघडकीस! ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्तडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची नामंकित कंपन्यामध्ये निवडकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिमी पावसाची नोंदकोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूच; राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३६.०६ फुटांवर, ६० बंधारे पाण्याखालीजागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन: जागरूकता आणि आरोग्य रक्षणअर्जेंटिनाचा 'महा-चमत्कार': २-० ने पिछाडीवर असूनही इजिप्तचा केला धुव्वा; थरारक विजयासह क्वार्टरफायनलमध्ये धडक!

जाहिरात

 

कोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

schedule08 Jul 26 person by visibility 144 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.

कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण १ हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर – ६७०, सांगली – ४५८, रत्नागिरी – १४६ आणि सिंधुदुर्ग – ८६ रुग्णालयांचा समावेश आहे.

उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथके गठित केली जाणार आहेत. ही पथके प्रत्येक रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करणार आहेत.

 तपासणीदरम्यान रुग्णालयामध्ये रुग्णशुल्क व इतर सेवा शुल्काचे दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क संहिता ठळकपणे प्रदर्शित केली आहे का, अग्निसुरक्षा (फायर ऑडिट) पूर्ण करण्यात आले आहे का, तसेच इतर आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, आवश्यक सुविधांचा अभाव, खोटी माहिती, बेकायदेशीर कामकाज किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अधिनियमातील तरतुदीनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई कोणत्याही संस्थेला त्रास देण्यासाठी नसून राज्यातील नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व खासगी रुग्णालयांनी नियमांचे काटेकोर पालन करून तपासणी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes