पुणे - बेंगलोर महामार्गावरील गांधीनगर उड्डान पुलानजीक गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो मुद्देमालासह जप्त; एकास अटक
schedule07 Oct 24 person by visibility 405 categoryगुन्हे
कोल्हापूर : पुणे - बेंगलोर हायवेवरील गांधीनगर उड्डान पुलानजीक सर्व्हिस रोडवर 4,05,000/- रुपये किमंतीच्या गुटख्याची वाहतूक करताना 01 आरोपीसह टेम्पो पकडून एकूण 07,19,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूरने केली
आज दिनांक ०७ ऑक्टोंबर रोजी पुणे बैंगलोर हायवेवरुन अवैद्य गुटख्याची वाहतुक होणार असलेची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली, सदर माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, सागर चौगले, यशवंत जाधव, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील या पथकाने पुणे बेंगलोर जाणारे रोडवर गांधीनगर उडडान पुलानजीक सापळा लावून अवैद्यरित्या गुटखा वाहतुक करीत असताना मारुती सुझुकी कॅरी कंपनीचा टेम्पो क्र. MH-09-EM-3950 हा पकडला. त्या गाडी चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रावत दुंडाप्पा उकली वय ४२, रा. आयडीयल स्कुलचे मागे, सोलगे मळा, शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे सांगितले. टेम्पोमध्ये असलेल्या मालाबाबत त्याचेकडे विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर पंचासमक्ष रावत उकली व त्याचे टेम्पोची झडती घेतली असता त्याचे कब्ज्यात 4,05,000/- रुपये किमंतीचा गुटख्याचे साहित्य मिळून आले.
सदरचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे. या बाबत गांधीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे, सागर चौगले, यशवंत जाधव, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांचे पथकाने केलेली आहे.