'अपूर्वा' नगरात घुमला भक्तीचा गजर; चिमुकल्यांच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध!
schedule26 Mar 26 person by visibility 160 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर येथील पाचगाव रोड परिसरातील अपूर्वा नगरामध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला रंगला बालकलाकारांच्या संगीत अविष्काराचा कार्यक्रम गजर भक्तीचा,
कृतीतून संस्कार हा मुख्य उद्देश असणाऱ्या या कार्यक्रमात अलंकार कला अकादमीच्या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, वादन कौशल्याने भक्ती गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या रुजलेले सोशल मीडियाचे भूत कमी करण्याच्या हेतूने कोल्हापुरातील काही सजक पालक सक्रिय आहेत व या सजग पालकांच्या कल्पनेतून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे सादरीकरण विना मोबदला शहराच्या विविध भागात केले जात आहे.
राम नवमीच्या या पूर्वसंध्येला या झालेल्या उपक्रमास परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत प्रामाणिक हेतूने व प्रयत्नाने सादर झालेल्या या संगीतमय सादरीकरणास लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पालक वेदा सोनुले, अमृता दैनी, अमृता गुळवणी आणि सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या सादरीकरणात सारंग सोनुले, मुक्ता गोगटे, दक्षि सामंत यांनी गायन केले. याला सुरेख अशी तबला व हार्मोनियमची साथ संगत अनुक्रमे सोहम जाधव व सुभान दैनिक यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरव गुळवणी याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिसरातील रहिवासी तेजस परांडेक, कलाकार परिचय ईशान कुलकर्णी व आभार प्रदर्शन श्रीहरी कुलकर्णी यांनी केले. सहभागी श्रोत्यांनी या सर्व बालक कलाकारांचे तोंड भरून कौतुक केलेच व भविष्यातील प्रगतीसाठी त्यांना शुभाशीर्वाद दिले. रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामुळे भागातील वातावरण राममय झाले आहे.