कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या प्रवेश फेरीअंती कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या सर्व विभागातील १०० % जागांवर विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झालेली आहे.
स्वायत्त महाविद्यालय, कालसुसंगत अभ्यासक्रम, विद्यार्थी केंद्रित व पारदर्शी परीक्षा पद्धती, आयडिया लॅब यासारख्या आधुनिक शिक्षण पद्धतीचे अनेक पैलू केआयटीत असल्यामुळे दुसऱ्या फेरी अंती महाविद्यालयाच्या ८०-९० % जागा निश्चित केल्या जातील असा विश्वास संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.
केआयटी ला अनेक गुणवंत विद्यार्थी सर्वाधिक पसंदी दाखवत असल्याचे लक्षात आलेने या वर्षी पासून महाविद्यालय प्रशासनाने गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती कॉलेज च्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे वर्ग दि. १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरु केले जातील अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.विद्यार्थ्यांनी आपापले प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावेत असे आवाहन महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक डॉ.महेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.