SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरीकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसंजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्तीकामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरजेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

जाहिरात

 

संजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्ती

schedule11 Feb 26 person by visibility 119 categoryसामाजिक

कोल्हापूर : संजय घोडावत ग्रुप आणि वारणा उद्योग समूह यांनी आमदार विनय कोरे व संजय घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे राबविलेल्या विशेष उपक्रमातून ४३ महिला प्रवाशांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाची संधी मिळाली. स्टार एअरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा प्रवास संबंधित महिलांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला.

 या प्रसंगी बोलताना संजय घोडावत म्हणाले, "ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना हवाई प्रवासाचा अनुभव देऊन त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.  जीवनातील पहिलाच विमानप्रवास करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल आणि समाधान स्पष्ट दिसत होते."

स्टार एअरकडून या महिला प्रवाशांचे एअर पोर्टवर विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, "आपल्या आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास करणाऱ्या या महिलांच्या प्रवासाचा भाग होण्याची आणि त्यांच्या दीर्घकाळ जपलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान स्टार एअरला वाटत आहे." अशा उपक्रमांमुळे प्रादेशिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाबाबतची बांधिलकी अधोरेखित होत आहे. हवाई प्रवास अधिकाधिक समुदायांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने स्टार एअर सातत्याने प्रयत्नशील आहे.

स्टार एअर सध्या देशभरातील ३१ विमानतळांवर सेवा देत असून प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. उदयोन्मुख शहरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-अनुकूल हवाई सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचेही मत यावेळी स्टार एयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरन यांनी व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes