SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेटरोटरीचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल : खासदार धनंजय महाडिक; कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी प्रदानकोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण: ‘शौर्यगाथा’ कार्यक्रमात शाहू महाराज आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सहभागस्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोल्हापूर महापालिका आरोग्य कर्मचारी व विविध सेवाभावी संस्थांचा सन्मानराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण रंकाळा परिसराची स्वच्छताजागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधीराज्यातून मान्सून ८ ऑक्टोबर पासून निरोप घेणारनगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

जाहिरात

 

पूरग्रस्तांच्या मदतीचा पहिला ट्रक उद्या सोमवारी धाराशिवला रवाना होणार....

schedule28 Sep 25 person by visibility 173 categoryसामाजिक

▪️आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत, पूरग्रस्तांच्यासाठी जमा झालेल्या मदतीची घेतली माहिती...
▪️खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीचा ट्रक धाराशिवला जाणार...
कोल्हापूर  : विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केलाय. त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पूरग्रस्तांच्याकरिता मदत संकलित करण्यात येत असून, आज पाचव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू होता. 24 सप्टेंबर पासून पूरग्रस्तांच्यासाठी ही मदत संकलित करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. गेल्या चार दिवसापासून पूरग्रस्तांच्या करिता जी मदत संकलित झाली होती, त्याबाबतची माहिती त्यांनी घेतली. ही मदत एकत्रितरित्या एका ट्रक मधून पूरग्रस्तांच्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरातील काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जाणार आहेत. यांशिवाय पूरग्रस्तांच्यासाठी जमा झालेले धान्य त्याच पॅकिंग त्याचबरोबर, जीवनावश्यक वस्तूंचे  तयार करण्यात आलेले किट याबाबत त्यांनी माहिती घेऊन सूचना केल्या. 

 उद्या सोमवारी 29 सप्टेंबरला ही मदत धाराशिव जिल्हयात पाठवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 25 कार्यकर्ते देखील जाणार आहेत. खासदार शाहू महाराजांच्या उपस्थित उद्या 12 वाजता मदतीचा ट्रक धाराशिवला जाणारं असून. कोल्हापूरकरांनी जे दातृत्व दाखवलं त्याबद्दल देखील आमदार सतेज पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांच्यासाठी मदतीचा हात दिला त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes