मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्यासह न्यायमूर्तींनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
schedule17 Aug 25 person by visibility 230 categoryराज्य

कोल्हापूर : सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर कोल्हापूर मध्ये आले असून त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी श्री अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले.
विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, अन्य न्यायमूर्ती व विधी, महसूल विभागासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना देवीची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.