कोरे अभियांत्रिकी मध्ये “डिजिटल फाऊंड्री : कार्यशाळेचे उदघाटन
schedule18 Aug 25 person by visibility 244 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल विभाग आणि एआयसीटीइ (वाणी) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत “डिजिटल फाऊंड्री: आयओटी, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचे एकत्रीकरण” या विषयावर तीन दिवसीय होणाऱ्या कार्यशाळेचे दिमाखदार उदघाटन झाले. याचा उद्देश तांत्रिक शिक्षणामध्ये भारतीय भाषांच्या वापरला प्रोत्साहन देणे हा आहे. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेचा स्वागत व सत्कार सोहळा चंद्रशेखर डोल्ली (अध्यक्ष, मयुरा स्टील्स प्रा. लि., कोल्हापूर), गणेश गाडवे, शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, समन्वयक डॉ. एम. एस. धुत्तरगाव, डॉ. एस. व्ही लिंगराजु आणि सर्व सहभागीच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी मातृभाषेतून शिक्षण हि काळाची गरज बनली आहे असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी वारणा विद्यापिठाबद्दलही माहिती दिली.
चंद्रशेखर डोल्ली आपल्या यशस्वी वाटचालीचा जीवनपट सगळ्यांसमोर उलगडला. डॉ. एस. एम. पिसे यांनी सांगितले कि बाहेरच्या प्रगत देशात शिक्षण मातृभाषेत दिले जाते तसेच आपल्या देशातील शिक्षण ही मातृभाषेतून व्हावे असे मत व्यक्त केले. डॉ. डी. एन. माने यांनी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे सांगितले. समन्वयक डॉ. एम. एस. धुत्तरगाव यांनी या कार्यशाळेची वैशिष्ठे, उद्दिष्टे यांची माहिती दिली.
या कार्यशाळेत दीडशेहून अधिक विद्यार्थी, उद्योजक आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णकुमार जोशी आणि डॉ. नारायण धाराशिवकर यांनी केले, आभार डॉ. प्रमोद मुळीक यांनी मानले.