डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे १४ विद्यार्थी; शिवाजी विद्यापीठाच्या 'टॉप टेन'मध्ये; अंतिम वर्ष अभियांत्रिकीची गुणवत्ता यादी जाहीर
schedule18 Aug 25 person by visibility 161 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्तायादी जाहीर झाली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या फॅकल्टी ऑफ इन्जिनिअरिगचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये सिद्धीका कृष्णात पाटील हिने अव्वल स्थान पटकावले आहे. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे विद्यार्थी दरवर्षी या गुणवत्ता यादीत चांगली कामगिरी नोंदवत आले असून यावर्षीही यशाची ही परंपरा कायम राहिली आहे.
शिवाजी विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २००२५ मध्ये अभियांत्रिकी अंतिम वर्ष परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये सिद्धीका कृष्णात पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या विभागाच्या सात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये साक्षी शिवानंद जाधव (द्वितीय), आदिती विनायक पाटील (तृतीय), अर्चिता सतीश गोपलानी (चौथा), निहालअहमद अस्लम शेख, (पाचवा), मानसी विजय सूर्यवंशी (सातवा), साक्षी संभाजी मेंकर (आठवा) क्रमांक मिळवला आहे.
सिव्हील विभागामध्ये सानिका दिलीप मोहिते हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मॅकेनिकल विभागात दस्तगीर जमादार याने द्वितीय तर वैष्णवी वसंत वरपे हिने तृतीय स्थान मिळवले आहे. इलेक्ट्रिकल विभागामध्ये सानिका सुधीर लांबे (पाचवा), अनिकेत मोहन चव्हाण (सहावा), राजवर्धन उत्तम चौगुले आणि रसिका रविंद्र कातवारे (संयुक्तपणे नववा) क्रमांक प्राप्त केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.