लोकसेवेचा वारसा व बाळासाहेबांचे विचार अखंड पुढे नेणार : आ. राजेश क्षीरसागर
schedule25 Nov 26 person by visibility 216 categoryसामाजिक
◼️वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात सेवाभावी उपक्रमांची रेलचेल; २१ दिंड्यांना टाळ-मृदंग तर गरजूंना मदतीचा हात
कोल्हापूर : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आणि लोकसेवेचा वारसा कायम जपत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अविरत कार्यरत राहण्याचा विश्वास आमदार तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध सामाजिक, आरोग्यविषयक, धार्मिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वारकरी संप्रदायाचा वारसा तसेच भजन-कीर्तन परंपरेला बळ मिळावे, या हेतूने शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंग प्रदान करण्यात आले. सेवाभावी कार्यासोबतच सांस्कृतिक व धार्मिक जपणुकीवरही विशेष भर देण्यात आला.
सायंकाळी शिवालय कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेना महिला आघाडीने औक्षण केल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, समन्वयक विनायक साळोखे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण सभापती शीला सोनुले, परिवहन सभापती सत्यजित जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, सौ. दिशा क्षीरसागर, सौ. पूजा क्षीरसागर, माजी नगरसेवक सुहास सोरटे, माजी नगरसेवक मारुती माने, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका वंदना मोहिते, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, शहरप्रमुख रणजीत जाधव आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन समाजकारण व राजकारण करण्याची दिशा बाळासाहेबांनी दिली. जनतेचे प्रश्न सोडवत त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे हेच आपले उद्दिष्ट आहे. सत्ता व पदांपेक्षा जनतेचा विश्वास हीच सर्वात मोठी शक्ती असून, या आशीर्वादाच्या बळावर विकास आणि समाजसेवेचा आवाका अधिक वाढवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे, खासदार छत्रपती शाहू महाराज, उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योगमंत्री ना. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयंत आसगांवकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. दिवसभर शहर व जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
◼️वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम
* गोमाता पूजन व चारा वाटप : राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथील गोमाता संस्थेला चारा व पशुखाद्य देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले. याप्रसंगी मंदार तपकिरे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दादू शिंदे, शुभम ठोंबरे, अर्जुन संकपाळ आदी उपस्थित होते.
* बेघर व गरजूंना ब्लँकेट वाटप : शिवसेना मंगळवार पेठ विभागाच्या पुढाकाराने भवानी मंडप, रेल्वे स्टेशन, एसटी बस स्थानक आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी उघड्यावर व फुटपाथवर झोपणाऱ्या बेघर व गरजू नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप करून थंडीपासून दिलासा देण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, गणेश रांगणेकर, राजू पाटील, सचिन पाटील, राहुल चव्हाण, विश्वनाथ माळकर, विजय देसाई, गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, शेखर चौगुले, किरण अतिग्रे आदींची उपस्थिती होती.
* अनाथआश्रमात जीवनावश्यक साहित्य : मंगळवार पेठ येथील अनाथआश्रमातील मुलांना सामाजिक कार्यकर्ते आशिष पवार यांच्या पुढाकारातून युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी शहरप्रमुख साक्षी रांगणेकर, समन्वयक विनायक साळोखे, रणजीत मंडलिक, बाळासाहेब पोवार, गौरी माळतकर, राजू पाटील आदी उपस्थित होते.
* अंध विद्यार्थ्यांना उबदार कपडे : अंध युवक मंच संचलित अंध मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वेटर आणि गरम कपडे सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी संदीप ढणाल, संदीप जाधव, विक्रम मोतीपुरे, अमित ओतारी उपस्थित होते.
* रुग्ण व अनाथ बालकांना फळवाटप : जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अंकुश निपाणीकर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले दवाखाना तसेच बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना मोफत फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कमलाकर जगदाळे, दीपक भाऊ चव्हाण, उदय देसाई, देवेंद्र खराडे, धैर्यशील साळुंखे, रविराज पवार, प्रणव कलकुटकी, सॅमसंग गायकवाड तसेच पांजरपोळ शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
* जोतिबा मंदिरात अभिषेक : आमदार राजेश क्षीरसागर यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो तसेच जनसेवेचे कार्य अधिक गतिमान व्हावे, यासाठी श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने अभिषेक व प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी शाहू झुगर, भारत झुगर, उदय सुतार, प्रकाश उपाध्ये, गणेश चौगले, जयवंत शिंगे, संजय आमाने, अक्षय दादर्णे, कैवारी मिटके, सागर मिटके, संदीप ठाकरे आदी उपस्थित होते.
* आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम : उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ विभागाच्या वतीने केएमटी कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब स्वास्थ्य कार्ड, नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर, कुष्ठधाममधील रुग्णांना जीवनावश्यक वस्तू आणि पंचगंगा हॉस्पिटलमधील नवजात बालकांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, प्रकाश डोंगळे, अनंत पाटील, सूरज धनवडे, राकेश पवार, सुनील काशीद, अमर जाधव, अजिंक्य शिदृक आदी उपस्थित होते.