SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते 46 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभमाजी मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलमध्ये श्रद्धांजलीदक्षिण महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी लोकप्रतिनिधींची बैठक घेणारदूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : डॉ.अभिनव गौरवमुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरे, चाळींचा झपाट्याने विकास होणारराज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा फुले योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागूलाडकी बहिण योजनेचे मानधन १५०० रुपया वरून २१०० रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली : सतेज पाटील यांचा विधिमंडळ अधिवेशनात सवाल कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय : सतेज पाटील यांचा सवाल विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई

जाहिरात

 

दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : डॉ.अभिनव गौरव

schedule11 Dec 25 person by visibility 104 categoryउद्योग

▪️आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रतिनिधींनीची गोकुळला भेट: गोकुळच्या कामकाजाचे कौतुक

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टी.एम.आर. उत्पादनाचा वापर वाढविणे तसेच म्हैस पालनाची सुधारित पद्धत शोधून काढणे व जनावराची प्रजनन क्षमता सुधारणे यासाठी हा संशोधन प्रकल्प राबविला होता या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी इडीफ व बायफ याचे प्रतिनिधी यांनी गोकुळ दूध संघास भेट दिली असता गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ) भारताचे मुख्य सल्लागार डॉ.अभिनव गौरव गोकुळ दूध संघाच्या भेटीदरम्यान संघाच्या कार्यपद्धतीचे व शेतकरी-केंद्रित धोरणांचे मनःपूर्वक कौतुक केले. गेल्या तीन  वर्षांपासून आमच्या संशोधन प्रकल्पासाठी गोकुळ दूध संघाची निवड केली आहे. गोकुळवर दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच संघाची खरी ताकद आहे. हा विश्वास कायम टिकवण्यासाठी गोकुळ सातत्याने शेतकरीहित काम करावे. गोकुळमध्ये राबवलेल्या प्रकल्पाचे कौतुक करत, दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत गोकुळला प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये गोकुळच्या यशस्वी योजनांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण होणार आहे.

 यावेळी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ) उपाध्यक्ष अँड्र्यू हटसन यांनी व म्हणाले की, “गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादकांप्रती असलेले कामकाज अतिशय प्रभावी, पारदर्शक व समाधानकारक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की आगामी काळात म्हैस दुधाला मोठ्या प्रमाणात जागतिक मागणी वाढणार असून म्हैस दुधास दुग्धव्यवसायामध्ये चांगले भविष्य आहे. गोकुळ दूध संघाने जनावरांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, आरोग्य सुधारणा व उन्नतीसाठी आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संशोधनाला चालना देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले व (इडीफ) सद्याचा हा संशोधन प्रकल्प पुढे विस्तार करून मोठ्या प्रमाणात म्हैस पालन, उत्पादन वाढीसाठी गोकुळ सोबत राबविले जाईल.

  यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचे प्रजनन क्षमता व वंध्यत्व निवारण हे महत्वाचे असून बायफ व इडीफ यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात असे वेगवेगळे उपक्रम गोकुळ संघामध्ये राबवावेत असे मनोगत व्यक्त केले.

 बायफचे प्रतिनिधी सचिन जोशी म्हणाले, गोकुळसोबत काम करणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात अशा प्रकल्पांवर गोकुळसोबत कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.” त्यांनी गोकुळचे सर्व संचालक, अधिकारी व कार्यकारी मंडळांना प्रशिक्षण बायफ उरळीकांचन येथे कार्यशाळेसाठी विशेष आमंत्रण दिले.

या प्रतिनिधींनी आज पहाटे ५ वाजता पुनाळ, यवलुज, कोपार्डे, सडोली खालसा, बाचणी या गावातील निवडक प्राथमिक दूध संस्थेमधील संकलन प्रक्रिया, जनावराची पाहणी, दूध उत्पादक मिटिंग, वैरण बँक शिंदेवाडी व महालक्ष्मी टी. एम.आर.प्लांट भेट दिली. त्यानंतर गोकुळच्या मुख्य प्रकल्पातील उत्पादन, गुणवत्ता तपासणी व वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच खासकरून पशुसंवर्धन विभागाची सविस्तर माहिती घेतली.

 यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी गोकुळच्या विविध योजनांबाबत तसेच शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामुळे गोकुळ दूध संघाच्या कार्यपद्धतीला आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक मिळाले आहे.

यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिकेचे अँड्र्यू हटसन, जॉन टॉझेल, अॅलिसन ईगल, डेरेक टेपे, बायफचे मुख्य सल्लागार डॉ. अभिनव गौरव, डॉ.सचिन जोशी, डॉ. किशोर नवले, उदय वड्डी, वरुण गांधी, अक्षय जोशी, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.दयावर्धन कामत, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes