माजी मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलमध्ये श्रद्धांजली
schedule11 Dec 25 person by visibility 51 categoryसामाजिक
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरु हायस्कूल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी मुख्याध्यापिका माधुरी कोरडे यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. नेहरू हायस्कूल मार्फत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणेत आली. या प्रसंगी चेअरमन गणी आजरेकर यांनी श्रीमती माधुरी कोरडे या विध्यार्थिनी प्रिय शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका पदावर असताना प्रभावी कार्य केल्याच्या आठवणींच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.
संस्थेच्या मुलींच्या बाबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते . शाळेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सुद्धा त्या शाळेमध्ये येऊन मुलांची विचारपूस करायच्या मुलांना खास करून मुलींचे त्यांच्यावरती प्रेम होते.
या प्रसंगी संस्थेचे प्रशासक हाजी कादरभाई मलबारी , शालेय समिती चेअरमन रफीक शेख , संचालक रफीक मुल्ला , हाजी लियाकत मुजावर , हाजी जहाँगीर अत्तार , मुख्याध्यापक काझी एस.एस. , शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.