कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे कार्य कौतुकास्पद; सवाईल कॅन्सर मोफत लसीकरण शिबीरात 220 युवतींना लस
schedule11 Dec 24 person by visibility 193 categoryसामाजिक
इचलकरंजी : बांगड माहेश्वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने, तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा, महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीत सवाईकल कॅन्सर (गर्भाशय ग्रीवा कर्करोग) चे मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले. यामध्ये 220 युवती ना लस देण्यात आली.
या शिबीरा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा के मंत्री सत्यनारायण सारडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष विनीत तोष्णीवाल, प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटी, सहमंत्री मनमोहन कासट, माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी, राज्य कार्यसमिती सदस्य शांतीकिशोर मंत्री, जिल्हा महिलाध्यक्षा पुष्पा काबरा, महेश सेवा समिती सचिव राधामोहन छापरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प प्रमुख श्रीकांत मंत्री यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी असे सागितलें की अशा पध्दतीचे शिबीर महाराष्ट् राज्य मधे माहेश्वरी समाजा मार्फत प्रथम होत आहे. आजच्या काळासाठी अशी शिबीरे अत्यंत आवश्यक आणि लाभदायक असल्याचे सांगितले. डॉ. मोहिनी धूत व डॉ. राहुल चव्हाण यांनी या लसीकरणाच्या लाभाबाबत उपयुक्त माहिती दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी महेश क्लबचे अध्यक्ष बनवारीलाल झंवर, किशोर मुंदडा, महेश भुतडा,युवा संगठन अध्यक्ष आनंद बांगड, विनय बाल्दी, मुरली हेडा, व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे व महेश क्लब चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. युवा संघटनेच्या संपूर्ण टीमने सांघिक कार्याचा आदर्शवत उदाहरण प्रस्तुत केले.
शिबिरात महासभेचे माजी अध्यक्ष व बांगड ट्रस्टचे प्रमुख रामपाल सोनी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा चे अध्यक्ष मधुसूदन गांधी, जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया समाजातील ज्येष्ठ चंदनमल मंत्री, डॉ. श्रीवल्लभ मर्दा, डॉ. ललित सोमाणी, भिकुलाल मर्दा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी ऑनलाईन नोंदणी घेतली होती. त्यामध्ये 220 जणांनी नोंदणी केली होती. पुढील लसीकरण शिबिर लवकरच आयोजित केले जाणार आहे. कार्यक्रम चे सूत्र संचालन जिल्हा युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा व जिल्हा सचिव लालचंद गट्टाणी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पाडले.