SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकरताणतणावमुक्त जीवन: काळाची गरज आणि आंतरराष्ट्रीय ताणतणाव जागरूकता दिनस्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची सादकेंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल : खासदार धनंजय महाडिककागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणीराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरास्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव

जाहिरात

 

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

schedule04 Nov 26 person by visibility 124 categoryउद्योग

◼️हेरवाड येथे शेतकरी दूध व्यवसाय संस्थेचा बोनस, पतसंस्थेकडून दिवाळी भेटवस्तू आणि बचत मंडळाचा लाभांश वाटप सोहळा 

हेरवाड : शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांच्या हितासाठी शेतकरी दूध व्यवसाय संस्था , हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तसेच शेतकरी बचत मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता या संस्था सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. सहकाराच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक बळ देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या संस्थांकडून होत असल्याचे गौरवोद्गार अजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.

हेरवाड येथील शेतकरी दूध व्यवसाय संस्था, हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि शेतकरी बचत मंडळ यांच्या वतीने आयोजित बोनस, दिवाळी भेटवस्तू आणि लाभांश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शेतकरी दूध व्यवसाय संस्थेच्या सभासदांना बोनसचे वाटप करण्यात आले. हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या, तर शेतकरी बचत मंडळाच्या वतीने सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासो पाटील असुर्लेकर, बाळासो माळी, बाबुराव माळी, वैभव पाटील, सुनील माळी यांच्यासह तिन्ही संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes