SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उत्साहातप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलावईद ए मिलादनिमित्त "यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र" तर्फे राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजनमेन राजाराम कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा..प्रणव मोरे बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यरोटरी क्लब ऑफ गार्गीजचे बारावे "यामिनी" प्रदर्शन १९,२०.२१ सप्टेंबर रोजी आयोजितराधानगरीत रानभाजी महोत्सव संपन्नव्यक्तीने कलासक्त असणे गरजेचे : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदनकोल्हापूर : हातभट्टीची दारु तयार करणारे 07 अड्डे उध्वस्त, एकूण 3लाख 21 हजार ,800/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

येणाऱ्या काळात आरोग्यसेवेसाठी खर्चच करावा लागणार नाही : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

schedule26 Jul 25 person by visibility 436 categoryआरोग्य

▪️आरोग्य तपासणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
▪️मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे सेवा रुग्णालयात आयोजन

कोल्हापूर : राज्यात शासनाने सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केले. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच परिसरात आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून भविष्यात आरोग्यसेवेसाठी रुग्णांना खर्चच करावा लागणार नाही, यासाठी राज्यभर मोफत आरोग्य सुविधा उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. कोल्हापूर येथील सेवा रुग्णालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले, सेवा रुग्णालयात येणाऱ्या काळात एम.आर.आय., सी.टी. स्कॅन मशीन, कॅथ लॅब आणि आय.पी.एच.एल. लॅब या अत्याधुनिक प्रस्तावित सुविधांमुळे नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतील. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, त्यांची आरोग्य तपासणी, शासन आपल्या दारी अशा अनेक योजनांद्वारे उल्लेखनीय काम केले आहे. आतापर्यंत राज्यातील एक कोटी महिलांची कर्करोग तपासणी पूर्ण झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरात १ हजार नागरिकांची तपासणी, आवश्यक साहित्यांचे वाटप आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात गतीने पुढे नेणार असून, नागरिकांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत चष्मे आणि श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी आभार मानले. या शिबिरात आणि प्रस्तावित कामांच्या शुभारंभ सोहळ्यात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes