कोल्हापूर : हातभट्टीची दारु तयार करणारे 07 अड्डे उध्वस्त, एकूण 3लाख 21 हजार ,800/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule14 Sep 25 person by visibility 152 category

कोल्हापूर : कंजारभाट वसाहत साईनगर कणेरीवाडी, कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर व माणगांववाडी, ता. हातकणंगले येथील हातभट्टीची दारु तयार करणारे 07 अड्डे उध्वस्त. एकूण 3,21,800/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई साने गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
कंजारभाट वसाहत साईनगर, कणेरीवाडी, माणगांववाडी, ता. हातकणंगले व कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारु तयार करतात. मिळालेल्या माहितीनुसार पथकानी दि. 14 सप्टेंबर रोजी पहाटे 01) साईनगर कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी, 02) माणगांववाडी, ता. हातकणंगले व 03) कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या भट्टयावर 07 ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टीची दारु तयार करणेचे अड्डे उध्वस्त केले आहेत. सदर ठिकाणावरुन एकूण 3400 लिटर कच्चे रसायन, 900 लिटर पक्के रसायन, 470 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, एक अँक्टीव्हा मोपेड गाडी व इतर साहित्य असा एकूण 3,21,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. रसायन व दारु तयार करणेचे सर्व साहित्य जागीच नाश केले.
कंजारभाट वसाहत साईनगर कणेरीवाडी येथील काजल घारूंगे, प्रियांका घारूंगे, सुरेखा घारूंगे, हिना बागडे, पुजा बाटुंगे सर्व रा. साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचेविरुध्द गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे. कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर येथील प्रकाश बागडे, चरण बागडे, शक्ती माटुंगे, रोहीत माटुंगे सर्व रा. कंजारभाट वसाहत मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे विरुध्द राजारामपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. माणगांववाडी ता. हातकणंगले येथील सुभाष खोत व रोहन खोत दोघे रा. माळभाग माणगांववाडी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर यांचे विरुध्द हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक , योगेश कुमार व अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय हुंबे, वसंत पिंगळे, संजय पडवळ, निवृत्ती माळी, प्रविण पाटील, सचिन पाटील, संतोष बरगे, विलास किरोळकर, अमित सर्जे, युवराज पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, रोहीत मर्दाने, नवनाथ कदम, दिपक घोरपडे, राजू कोरे, विनोद कांबळे, विशाल चौगुले व अरविंद पाटील यांनी केली आहे.