व्यक्तीने कलासक्त असणे गरजेचे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
schedule15 Sep 25 person by visibility 59 categoryराज्य

कोल्हापूर : व्यक्तीने जिंदादिली जपत असताना तो कलासक्त असणे गरजेचे आहे . भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे आहे . संविधानाच्या प्रास्तविकेचे विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .
संविधान प्रास्ताविकेचे सुमुह गायनाचे २० भाषेत १५०० गायक, ७५ गायिका “हम भारत के लोग, संविधानाचा महाविश्वक्रम” हा महागायनाचा कार्यक्रम आज दसरा चौक येथे पार पडला.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आ . राजेश क्षीरसागर,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे,बार्टीचे महासंचालक सुनील वारे,जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते .
संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य,डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून , 'हम भारत के लोग' अर्थात संविधान गीताचा महा विश्वविक्रम हा कार्यक्रम सादर करण्यात आला .यावेळी देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, आसामी,मैथिली,राजस्थानी,हिंदी, भोजपुरी,उर्दू,नेपाळी या सारख्या वीस भाषेतील संविधान प्रास्तविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले .विशेषतः मुकबधीर विद्यार्थी - कलावंतानी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली . यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून याबाबतचे प्रशस्तीपत्र या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकनवरे यांना श्री आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, प्राध्यापक आनंद भोजने,सतीश माळगे, उत्तम कांबळे , शहाजी कांबळे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .