के.एम.टी.च्या बिंदू चौक पे ॲण्ड पार्किंग येथे चोरट्यास अटक
schedule06 Oct 24 person by visibility 386 categoryगुन्हे
कोल्हापूर : श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी के.एम.टी. उपक्रमाच्या बिंदू चौक येथील "पे ॲण्ड पार्किंग" येथे वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देणेत आली आहे. सदर ठिकाणी पार्किंग करणेत आलेल्या वाहनांमधील वस्तूंची चोरी होत असल्याच्या तक्रारी परिवहन उपक्रमाकडे येत होत्या. त्यासाठी परिवहन उपक्रमाकडून कर्मचाऱ्यांचे पथक निर्माण करुन वाहनांवर लक्ष ठेवणेत येत आहे.
त्याप्रमाणे परिवहन उपक्रमाकडील अपघात इनचार्ज राजेश शंकरराव नाईक यांच्या अधिपत्त्याखाली नेमणेत आलेल्या पथकाकडून शनिवार दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी कलगोंडा भाऊसो पाटील, रा.हारोली, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या संशयीत चोरट्यास पार्किंग केलेल्या वाहनांचे दरवाजे उघडून चोरीचा प्रयत्न करत असतांना पकडणेत आले. त्याला पकडून जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे देणेत आले.
त्याच्याजवळ दोन मोबाईल हॅण्डसेट मिळून आले. पोलिसांकडून अधिक तपास करणेत येत आहे.