पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तीन ठार
schedule03 Oct 24 person by visibility 228 categoryगुन्हे
पुणे : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्येदोन पायलट आणि एक इंजिनिअर होता.प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाला.
हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड कौंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पायलट गिरीशकुमार पिल्लई (५३, रा. तेलंगणा), कॅप्टन प्रीतमचंद भारद्वाज (५६, रा. नवी मुंबई) आणि अभियंता परमजित रामसिंग (६४, रा. नवी दिल्ली) अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत