कोल्हापूर येथे गांजाची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे परप्रांतीय ताब्यात; मुद्देमाल जप्त
schedule12 Jan 25 person by visibility 345 categoryगुन्हे
कोल्हापूर : गांजा अंमली पदार्थाची कोल्हापूर येथे बेकायदेशीर विक्री करणेसाठी आलेल्या दोन परप्रांतीय इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून १० किलो ८७ ग्रॅम वजनाचा २,०१,७४०/- रु. किंमतीचा गांजा व दोन मोबाईल किमंत २०,०००/- रु असा एकूण २,२१,७४०/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना बातमी मिळाली की, मोरेवाडी चौक, हॉटेल ड्रीमलॅन्ड जवळ दोन परप्रांतीय इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम सँग घेवून व एक इसम प्रवासी बॅग घेवून मोरेवाडी चौक, हॉटेल ड्रीमलॅन्ड जवळ येवून थांबले त्यांच्या हालचाली संशयास्पद असलेने व मिळाले बातमीची खात्री झालेवर पथकाने त्यांचेवर छापा टाकुन त्यांना पकडले.
त्यांना नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी त्यांची नावे १] कैलाशसिंह उदयसिंह राजपूत, वय २२ वर्षे, २] किशनसिंह दौलतसिंह राजपूत, वय २१ वर्षे, दोघे रा. जालोकी मंदार, पोष्ट/तहसिल खमनोर, जिल्हा राजसमंद, राज्य राजस्थान अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडील सँग व प्रवासी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला एकूण १० किलो ८७ ग्रॅम वजनाचा २,०१,७४०/- रूपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ व २०,०००/- रूपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २,२१,७४०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. राजारामपूरी पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही इसमांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास राजारामपूरी पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, संतोष बरगे, अशोक पोवार, परशुराम गुजरे, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, राजु येडगे, प्रविण पाटील, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, महादेव कुराडे व सुशिल पाटील यांनी केली आहे.