कोल्हापूर शहरातील पाण्याची पितळी 39 मीटर चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक; 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule25 Sep 24 person by visibility 406 categoryगुन्हे
कोल्हापूर : रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना पकडुन पाण्याची पितळी 39 मीटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार प्रदिप मस्के याने कोल्हापूर शहर परिसरात घरगुती पिण्याचे पाण्याचे कनेक्शनचे पितळी मीटर भरपूर प्रमाणात चोरली असून तो चोरीची पाण्याची मीटर विक्री करणेकरीता कबनूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर गावचे हद्दीत कबनूर ओढयाजवळ येणार आहे. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने नमुद ठिकाणी सापळा लावून आरोपी प्रदिप बाळू मस्के, वय 24, रा. भगतगल्ली तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील चोरीचे पाण्याचे 10 पितळी मीटरसह पकडले.
त्यानंतर त्याचेकडे सखोल तपास करून त्याने आणखीन पाण्याचे पितळी मीटर चोरुन ते बाळू आनंदराव गोसावी, रा. खोतवाडी तारदाळ, ता. हातकणंगले यास विकलेचे सांगितलेने बाळू गोसावी यास ताब्यात घेतले. त्याने आरोपी प्रदिप मस्के याचेकडून पितळी मीटर विकत घेतल्याचे कबुल केले. त्याचेकडून चोरीची विकत घेतलेली पाण्याचे 29 पितळी मीटर जप्त केले. दोन्ही आरोपीकडे सखोल तपास करून चोरीची पाण्याची 39 पितळी मिटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील तपासकामी मुद्देमालासह जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, सागर माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, गजानन गुरख व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.