SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंब्रेला संस्थेमुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहलिंगायत समाजाच्या प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी कोल्हापुरात रविवारी साखळी उपोषणमहाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती; पुढील तीन वर्षांसाठी कार्यकाळपदभरती, पदोन्नतीला गती द्या : मंत्री प्रकाश आबिटकर‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढसैनिक टाकळीत एमआयडीसी झालीच पाहिजे; सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थांचा एल्गारडीकेटीईचे प्रा. सुयोग रायजाधव यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूरच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अमूल्य - खा. धनंजय महाडिककेशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटनऑगस्ट क्रांती मैदान: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अमर प्रतीक

जाहिरात

 

अंब्रेला संस्थेमुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

schedule08 Aug 26 person by visibility 106 categoryराज्य

मुंबई : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत या बँकिंगचे जाळे विस्तारण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी मुंबईत व्यक्त केला. तसेच, राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.

बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री शहा म्हणाले की, देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’चे सदस्यत्व घेऊन सुरक्षा संचालन केंद्राशी जोडले जावे. यामुळे ठेवीदारांचा विश्वास वाढून बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित होईल. देशातील सुमारे १,४०० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून, देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता उत्तम असून, विनातारण कर्ज मर्यादा अडीच लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४४९ सहकारी बँका असून देशातील सहकार क्षेत्रात राज्याचे मोठे योगदान असल्याने अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी ऑनलाइन बँकिंग सुरक्षित करणे आवश्यक असून, नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक सुविधेचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातील 'सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले आणि विविध उपक्रमांचे लोकार्पण व ग्रंथ प्रकाशन झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes