यशवंतराव चव्हाण यांना विद्यापीठात आदरांजली
schedule25 Nov 25 person by visibility 46 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण अध्यासनातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी, अध्यासनाचे समन्वयक डॉ. गजानन साळुंखे, डॉ. सुधीर देसाई, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, श्री. चेतन गळगे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.