SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाची कामगिरी कौतुकास्पद; 10 सुवर्ण व 12 रौप्य पदकांची कमाई

schedule25 Nov 25 person by visibility 324 categoryक्रीडा

कोल्हापूर : महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांतील खेळ गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करीत असते. महावितरणच्या 16 परिमंडलातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर परिमंडळाने सहभाग घेतला होता. या चार दिवसांच्या खेळ स्पर्धेत महावितरण कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंनी खूप चांगले प्रदर्शन करून कोल्हापूर परिमंडळातील खेळाडूंनी चांगली खिलाडूवृत्ती दाखवत 10 सुवर्ण व 12 रौप्य अशी पदकांची लयलुट केली त्याबद्दल कौतुक सोहळा सोमवार (दि.24) रोजी पार पडला. यावेळी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना मुख्य अभियंता काटकर स्वप्नील म्हणाले, ‘कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंनी महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सादर केलेली ही उल्लेखनीय कामगिरी परिमंडलासाठी अभिमानाची बाब आहे. क्रिकेट संघाने सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावून परिमंडलाचे नाव उंचावले आहे. सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये 10 सुवर्ण व 12 रौप्य पदकांची कमाई करून कोल्हापूर परिमंडलाच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा भक्कम ठसा उमटवला. या यशामुळे कोल्हापूर परिमंडलाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून आगामी 2026 मध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजक कोल्हापूर परिमंडल असून जनरल चँम्पियनशिप कोल्हापूर परिमंडलच घेईल असा विश्वास कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केला. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) पुनम रोकडे यांच्यासह सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते अजित अस्वले, सुधाकर जाधव, संगणक प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) आप्पासाहेब पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची उपस्थिती होती. प्रस्तावना उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी केली तर आभार सुरज बल्लाळ यांनी मानले. 

▪️कोल्हापूर परिमंडलातील खेळाडूंचे उल्लेखनीय यश 
सांघिक खेळ -: क्रिकेट– विजेता, खो-खो- पुरुष (उपविजेता),
 कॅरम – महिला (उपविजेता), टेनिक्वाईट- महिला-(उपविजेता).

वैयक्तिक खेळ -: विजेता खेळाडू - कुस्ती - ७४ किलो- गुरुप्रसाद देसाई, ७९ किलो- संदीप सावंत, 
थाळी फेक - पुरुष गट – इम्रान मुजावर, महिला गट- ज्योती कांबळे, गोळा फेक - महिला गट - पूजा ऐनापुरे, भाला फेक - महिला गट - अश्विनी जाधव,

 टेनिक्वाईट- महिला एकेरी – पुजा ऐनापुरे, *शरीरसौष्ठव* - ९० किलो– प्रविण घुणके, ८० किलो- राहुल कांबळे

उपविजेता खेळाडू - ८०० मीटर धावणे- पुरुष गट - वैभव माने, उंच उडी - पुरुष गट – सतीश पाटील, महिला गट –अश्विनी देसाई, कॅरम - महिला गट- विजया माळी, कुस्ती- ९७ किलो- हणमंत कदम, शरीरसौष्ठव - ६५ किलो- शिवम चौगुले, ७० किलो– अमित पाटील, पॉवर लिफ्टिंग – ७४ किलो – सागर जगताप, बॅडमिंटन - पुरुष एकेरी – इम्रान तासगावकर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes