संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण
schedule31 Dec 24 person by visibility 315 categoryगुन्हे
पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड याने पुणे शहर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता.
पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात खोटी खंडणीची तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामीनचा अधिकार असताना मी सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा करावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे आत्मसमर्पण होण्याआधी वाल्मीक कराड यांनी सांगितले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीकडे वर्ग केला होता. ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख याची अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. वाल्मीक कराड यानं आत्मसमर्पण केले. याप्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
वाल्मिक कराड शरण येणार याची बातमी समजल्याने वाल्मक कराड याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात सीआयडी कार्यलयाबाहेर गर्दी केली होती.