SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत यश

schedule30 Aug 25 person by visibility 595 categoryक्रीडा

वारणानगर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वारणा विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (TKIET) महाविद्यालयाची विद्यार्थिनी जानवी खामकर आणि  यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची (YCWM) विद्यार्थिनी हर्षला पाटील यांची ७५ व्या ज्युनियर बास्केटबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या १२ जणांच्या संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा २ ते ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान लुधियाना (पंजाब) येथे पार पडणार आहे.

विद्यार्थिनींची ही घोडदौड त्यांच्या वैयक्तिक मेहनतीबरोबर वारणा विभागातील क्रीडा संस्कृतीची देणगी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. स्पर्धात्मक वातावरणात जिल्हा व राज्यस्तरीय सामने गाजवून या खेळाडूंनी आपली चमक राष्ट्रीय पातळीवर दाखवली आहे.

या यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. क्रीडा प्रशिक्षक  उदय पाटील  यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले. या यशामुळे वारणा विद्यापीठासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, दोन्ही विद्यार्थिनींवर राष्ट्रीय पातळीवरील उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes