शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात
schedule01 Jul 25 person by visibility 183 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे, सुरेश बंडगर, विद्यार्थी विकास विभागाच्या सुरेखा अडके, अनिल साळोखे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.