व्हीनस कॉर्नर येथे के.एम.टी. बसवर दगडफेक प्रकरणी : तिघेजण अटक, एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
schedule16 Jan 25 person by visibility 376 categoryगुन्हे
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर येथे के. एम.टी. बसवर दगडफेक करणारे तीन आरोपींना अटक करण्यात आली तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. 14.01.2025 रोजी व्हीनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नलजवळ अज्ञात पाच ते सहा तरुण इसमांनी काहीएक कारण नसताना के. एम. टी. बसवर दगड मारुन बस क्रमांक एम.एच.09- सी. व्ही. 0411 या बसचे सुमारे 25,000/- रुपयाचे नुकसान केलेबाबत बसचालक प्रकाश ज्ञानू झोरे, रा. केदारनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी दिले तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 38/2025, बी. एन. एस. कलम 189(2), 192(2), 190 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधि. 3,7 सह म.पो. का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
काहीएक कारण नसताना दहशत माजिवणेचे उद्देश्याने घडलेला प्रकार हा चुकीचा असून अशाप्रकारे घटना घडणे भयावह असलेने नमुद गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या.
तपास पथकातील पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की, नमुद गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके, रा. राजारामपूरी कोल्हापूर याने व त्याचे साथीदारानी मिळुन केला असून अभिषेक घोडके याचे साथीदार हे सायबर चौक ते राजाराम कॉलेज जाणारे रोडवर आहेत. अशा मिळालेले माहितीचे आधारे तपास पथकातील पोलीस अमंलदार यांनी सायबर चौक ते राजाराम कॉलेज जाणारे रोडवर जावून आरोपी नामे (01) अभिषेक मंगेश घोडके व व. 26. रा. राजारामपूरी, कोल्हापूर 02) आसिफ आमनुल्ला नायकवडी, व.व.30, रा. इंगळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 03) ओंकार जगन्नाथ चौगुले, व.व.22, रा. पाथरुट गल्ली सायबर चौक कोल्हापूर तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. नमुद इसमांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयाची कबुली दिलेने त्यांना पुढील तपासकामी शाहूपुरी पोलीस ठाणेचे ताब्यात दिलेले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर तसेच पोलीस अमंलदार संतोष बरगे, वैभव पाटील, प्रविण पाटील, महेंद्र कोरवी, संजय पडवळ, अशोक पोवार, कृष्णात पिंगळे, राजू येडगे, लखन पाटील, शुभम संकपाळ यांनी केले आहे.