SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणीदलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला: डॉ. राजन गवसविद्यापीठात फोटोग्राफीचे हँड्स ऑन ट्रेनिंगमहायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने सत्कारभोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चाकोल्हापुरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागीने चोरणारी टोळी गजाआड कोल्हापुरात बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस अटक; ३,१३,०००/- रूपयेचा माल जप्तकोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवर तरुणाचा खून मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

जाहिरात

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी

schedule14 Sep 25 person by visibility 50 category

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा : उपमुख्यमंत्री
पुणे : शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक  उपस्थित होते.

पवार म्हणाले, खराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगर, केशव नगर, खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे.

या भागातील नागरिकांनी पाणी, रस्ते, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था, बसेस व्यवस्था आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असता त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही  पवार यांनी दिली.

मूढंवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना  पवार यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes