SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कारकोल्हापूर: बंद घराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; २.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगतसतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशाराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंदकोल्हापूर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठाजागतिक झुनोसिस दिन: मानवी आरोग्य आणि प्राण्यांचे संरक्षणयड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नथायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मासंभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

जाहिरात

 

कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कार

schedule06 Jul 26 person by visibility 106 categoryसामाजिक

कोल्हापूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. विवेकानंद घाटगे यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. 'मानवतावादी सांस्कृतिक चळवळ'च्या वतीने हा कार्यक्रम बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 सत्कारमूर्तींचा सत्कार पुष्पगुच्छ किंवा शाल-श्रीफळाऐवजी वही, पेन आणि पुस्तक भेट देऊन करण्यात येणार आहे. खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, महापौर रुपाराणी निकम, डॉ. रमेश विवेकी आणि उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते ॲड. घाटगे यांचा सत्कार होणार आहे.
ज्ञानदान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असून, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष भरत रसाळे आणि आयोजकांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला भरत रसाळे, अनिल म्हमाने, डॉ. कपिल राजहंस, सुरेश केसरकर, अॅड. करुणा विमल, विश्वास तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, अभिजीत मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने.अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes