भाजपला मोठा धक्का : आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही; तेलुगू देसम पार्टीची विरोधी भूमिका
schedule03 Nov 24 person by visibility 530 categoryदेश
नवी दिल्ली : भाजपचा मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीतझालेल्या भारतीय संविधान सुरक्षा परिषदेत टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान उर्फ अमीर बाबू यांनी या विधेयकाला समर्थन नसल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल. हे भारताचे दुर्दैव आहे की, देशात 10-12 वर्षांत असे काही घडले आहे, जे व्हायला नको होते. आमचे नेते चंद्राबाबू नायडू हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. ते हिंदू आणि मुस्लिमांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात.
ते पुढे म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांच्यानुसार, बोर्ड ज्या धर्माचा आहे, त्याच धर्माचे लोक तिथे असले पाहिजेत. आम्ही हे वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही. दुसरीकडे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ दुरुस्ती विधेयक अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यानस संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ विधेयक 2024 सादर केले होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केला. यानंतर सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली.