SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : पाण्यासाठी सभापती विशाल शिराळेंचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; चंबुखडी टाकीवरून थेट नियोजनमाधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : आमदार यड्रावकरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेजकोल्हापुरात होणार 'श्री राम कथा' आणि 'श्री राम यज्ञा'चे भव्य आयोजनपंजाबमध्ये 'डबल इंजिन' सरकारची गरज; नाभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध: जसविंदर सिंग नाभागोकुळ दूध संघ: ६४४ अपात्र संस्थांसाठी सतेज पाटील गट आता सर्किट बेंचमध्येप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार निसर्गाच्या सानिध्यात एक हक्काचा दिवस: 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवसपाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : आमदार यड्रावकर

schedule18 Jun 26 person by visibility 156 categoryसामाजिक

◼️नांदणीतील माधुरीच्या निवारा केंद्राची केली पाहणी

नांदणी : नांदणी मठात लवकरच माधुरी हत्तीणीचे पुनरागमन होणार असून इतर हत्तींसाठी देखील या निवारा केंद्रात सोय करण्यात येईल, तसेच माधुरी हत्तीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी ४० हून अधिक नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

नांदणी मठात माधुरीच्या निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माधुरीच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. माधुरीच्या पुनरागमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून तिच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

माधुरी हत्तीणीच्या निवासासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. शेडची रंगरंगोटी, सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची उभारणी केली जात आहे. हत्तींसाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले,  माधुरीच्या आगमनामुळे मठ परिसरातील प्राणिसंवर्धन उपक्रमाला अधिक बळ मिळणार असून पर्यटक आणि प्राणिप्रेमींसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

माधुरीला वनताराला नेत असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ४० हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वनताराचे धर्मेश सयानी , धनशाम पडरिया, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, सरपंच संगीता तगारे, माजी सभापती मिनाक्षी कुरडे, मायगोंड पाटील, सागर शंभुशेटे, संजय बोरगांवे, बाहुबली चौगुले, पी. एल. आंबी, बाबासो बागडी, प्रशांत लड्डे, राकेश पाटील-सावंत्रे, बबन टारे, सुजय पाटील, संजय कुरडे, रोहन पाटील, निखिल टारे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes