कोल्हापुरात महीलेस नजरबाधा झाल्याचे भासवुन फसवणूक : दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात, मुद्देमाल जप्त
schedule24 Dec 24 person by visibility 199 categoryगुन्हे
कोल्हापूर : वृद्ध महीलेस नजरबाधा झाल्याचे भासवुन फसवणुक करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन शाहुपुरी पोलीस ठाणेकडील एक फसवणुकीचा गुन्हा उघड करण्यात आला. त्याच्याकडून 1,68,950/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव व इतर पोलीस अमंलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत तांत्रीकदृष्ट्या तपास करुन व गोपनीयरित्या माहिती मिळवून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार लखन पाटील व सागर माने यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, दाखल गुन्हातील फसवणुक करून नेलेली सोन्याची चेन दोन संशयीत इसम घेवून ताराराणी चौक ते तावडे हॉटेल आणारे रोडलगत असणारे छत्रपती शाहु सांस्कृतीक मंदीर जवळील कंपाउंड जवळ येणार असल्याचे समजल्याने, मिळालेले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 24.12.2024 रोजी छत्रपती शाहु सांस्कृतीक मंदीर जवळील कंपाउंड जवळ जावून सापळा लावून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन सोन्याची चेन व गुन्ह्या करतेवळी वापरलेली मोटरसायकल मिळुन आली.
नमुद विधीसंघर्षग्रस्त बालक क्र 1 व 2 यांचे कब्जात मिळालेले सोन्याची चेन बाबत तपास केला असता त्याने शाहुपुरी पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हयाची कबुली दिली असून सदर गुन्हयातील फसवणुक करुन घेतलेली सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असलेचे सांगीतले. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकांचे कब्जातून 68,950 रुपये कींमतीची 9.850 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेन व 1,00,000/- रुपये किंमतीची मोटरसायकल असा एकूण 1,68,950, /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालके क्र 1 व 2 यांचेकडुन शाहुपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हा उघडकीस आला असून त्याचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह त्यास शाहुपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार विलास किरोळकर, सचिन पाटील, संजय पडवळ, संजय कुंभार, लखन पाटील, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, शुभम संकपाळ, महेश खोत, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, हंबीरराव आतिछो यांनी केली आहे.