SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या लाईनवर नागरीकांनी आपली नळ कनेक्शन शिफ्ट करावी; अन्यथा...तावडे हॉटेल येथील कमानीचा धोकादायक भाग आज उतविलाविद्यापीठात फूड बिझनेस जागृती कार्यशाळा उत्साहातमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनी मापन चाचणीएम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीची ‘चेतना’धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधनशिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपदपरदेश शिष्यवृत्तीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेतदिवाळी सुट्टीत कोल्हापुरातील सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरुमहिला लोकशाही दिन - 27 ऑक्टोबर रोजी

जाहिरात

 

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांना मिळणार अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचाराची मोफत सुविधा : ज्येष्ठ हदयरोग तज्ञ डॉ . गणेश इंगळे

schedule28 May 24 person by visibility 745 categoryआरोग्य

कोल्हापूर : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा शृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर मोफत व माफक दरात व पारदर्शक सेवा देणासाठी अत्यंत अत्याधुनिक असा ह्रदयरोग विभाग कार्यरत आहे. 

डॉ. गणेश इंगळे यांनी गेली १२ वर्ष ह्रदयरुग्णांसाठी प्रसिद्ध अशा नामांकित संस्थेत सेवा दिली आहे, ते आता सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली आरोग्य सेवा समाजातील सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. त्यांच्या आरोग्य कौशल्याचा समाजातील गरजू लोकांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले.

यावेळी बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गणेश इंगळे म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली ह्रदयरुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ह्रदयरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी लहानवयातील तरुणांनाहि ह्रदयरोगाशी सामना करावा लागत आहे. आज ह्रदयरुग्णांवर अत्याधुनिक उपचार घेणे हि क्लिष्ट बाब झाली आहे. आज सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये ह्रदयाशी संबंधित कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पेरीफेरल इंटरव्हेंशन- रिनल अँजिओग्राफी , रिनल अँजिओप्लास्टी , कायमस्वरूपी पेसमेकर रोपण हे उपचार केले जातात. तसेच स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेंशन साठी आवश्यक उपचार ही दिले जातात. याशिवाय एएसडी, पीडीए, व्हीएसडी, कोअरक्टोप्लास्टी उपचार तसेच ह्रदयाची शस्त्रक्रिया हि केली जाते. हे सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार मोफत, माफक व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्रदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी ह्रदयरोग’ विभाग आशेचा किरण ठरेल. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आहवान करण्यात आले आहे .

या वेळी अधिक माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश भरमगौडर म्हणाले, “पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार हा विभाग कार्यान्वित आहे. या विभागामुळे वंध्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे. या विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता अत्यंत अत्याधुनिक अशी कॅथ लॅब सह अन्य अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी डॉ. गणेश इंगळे यांनी यांनी या विभागाच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. प्रारंभी प्रस्तावना एच आर विभागाचे विवेक सिद्ध यांनी केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सत्याप्पा बाणे, दयानंद डोंगरे व अभिजित चौगले आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes