SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

जाहिरात

 

केआयटीमध्ये इनोव्हेशन व उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन; एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार

schedule16 Mar 25 person by visibility 974 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 ‘इनोव्हेशन आणि उद्योजकता’ या विषयाला घेऊन होणारी ही कार्यशाळा ऑफलाइन स्वरूपात असणार आहे. देशभरातील १६०० संस्थांमधून केवळ ५० संस्थांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील फक्त ४  संस्थांपैकी केआयटी ही एक संस्था आहे अशी माहिती केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली .

५  दिवसीय कार्यशाळेमध्ये इनोव्हेशन स्टार्टप्स, उद्योजकता, याचबरोबर बिजनेस मॉडेल ,प्रॉडक्ट मार्केट फिट, सेल्स स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, फायनान्स आणि आयपीआर  या विषयावरती विशेष सत्रांचे आयोजन केलेले असणार आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व स्टार्टअप इंक्युबेशन या विषयावरही संशोधन व उद्योजक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींबरोबर विशेष संवादाचे आयोजन या कार्यशाळेत करण्यात आले आहे. कार्यशाळेत विविध शैक्षणिक संस्थांमधील उद्योजकता व्यासपीठात काम करणारे, जबाबदारी असणारे प्राध्यापक,विद्यार्थ्यांना स्टार्टअप, हकेथॉन साठी मार्गदर्शन करणारे शिक्षक,उद्योजकता क्षेत्रात रुचि असणारे प्राध्यापक अशा लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केआयटीच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर आरळी यांनी केले आहे.

संपूर्णतः मोफत असणारी ही कार्यशाळा केआयटी कॉलेजमध्ये  होणार असून फक्त ५० शिक्षकांचीच निवड आयोजकांच्या माध्यमातून केली जाणार आहे.  कार्यशाळेच्या शेवटी एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या वतीने सहभागी प्राध्यापकांना ‘सहभाग प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. या कार्यशाळेच्या आयोजना साठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली,उपाध्यक्ष  सचिन मेनन ,सचिव दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes