डॉ. बापूजी साळुंखे इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यासातील एकाग्रतेसाठी योग, ध्यानाचे सत्र उत्साहात
schedule08 Apr 25 person by visibility 554 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक एकाग्रता, तणावमुक्ती , आरोग्यवर्धन साधण्यासाठी आणि अभ्यासात एकाग्रता वाढविण्यासाठी योग आणि ध्यान या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून रोपाला पाणी घालून व संस्थेच्या प्रार्थनेने झाली. उद्घाटनप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे,ट विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्राचे मुख्य आकर्षण ठरले ते आंतरराष्ट्रीय योगतज्ञ डॉ. संजय हाके यांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांना ध्यान, योग मुद्रा प्राणायाम, अष्टांग योग ,त्राटक ध्यान यांसारख्या योगप्रकारांची ओळख करून दिली. "योगसाधनेद्वारे मनाची स्थिरता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. अभ्यासात एकाग्रतेसाठी ध्यान हे प्रभावी साधन आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रा. भिर्डी यांनी शैक्षणिक दृष्टीने योगाचे महत्त्व सांगितले, तर प्राचार्य डॉ. सपाटे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या सत्राने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले,
हा उपक्रम इन्स्टिट्यूट मेंटरिंग सेल यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रा. प्रज्ञा फाळके यांनी समन्वयक म्हणून तर प्रा. अशोक कोळेकर यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. आभार प्रदर्शन प्रा. साहिल जमादार यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.