कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात युवकाचा खून; मुलीस त्रास देणाऱ्या जावयाचा चालत्या एसटीमध्येच सासू सासर्यानेच गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न
schedule26 Sep 24 person by visibility 609 categoryगुन्हे
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) या युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला ही घटना गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली. संशयितांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
गुरुवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एसटी प्रोव्हिजन स्टोअरच्या पायरीवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती एसटीच्या अधिका-यांकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो मृत झाल्याचे लक्षात आले. जवळ त्याची बॅग होती. गळ्यावर दोरीचे व्रण दिसत असल्याने गळा आवळून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
त्याच्याकडे मिळालेल्या एका डायरीत असलेल्या नावावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
🟣 मुलीस त्रास देणाऱ्या जावयाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न
जावयाकडून मुलीला वारंवार होणारा त्रास यामुळे चिडलेल्या सासरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पँटच्या नाडीने विना वाहक चालत्या एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर मार्गावर कागलजवळ जावयाचा खून केला.
मृतदेह कोल्हापुर मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून निघून गेले. गुरुवारी सकाळी खुनाचा प्रकारसमोर येताच शाहूपुरी पोलिसांनी चार तासांत सासू आणि सासऱ्यास ताब्यात घेऊन अटक केली.या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८) आणि गौरवा हणमंताप्पा काळे (वय ३०, दोघे रा. हुनगीनाळ) या दोघांना अटक करण्यात आली.