शिवाजी विद्यापीठामध्ये “शारीरिक शिक्षणातील नवप्रवाह आणि क्रीडा क्षेत्रातील करिअर संधी “ या विषयावर कार्यशाळा
schedule09 Jun 24 person by visibility 461 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभागामार्फत दि.11 जून 2024 रोजी स्कूल कनेक्ट मोहिमेअंतर्गत "शारीरिक शिक्षणातील नवप्रवाह आणि क्रीडा क्षेत्रातील करिअर संधी " या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 16 ते 18 वयोगटातील खेळाडू,क्रीडा शिक्षक, आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये हॉकी इंडिया चे strength and conditioning coach श्री. अर्थव देवंनावर व शारिरीक शिक्षण संचालक आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथपाल संघटना अध्यक्ष डॉ सुशांत मगदूम हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांनी केले आहे.