SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान; राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटनसैनिकांच्या गावाला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन स्थापना दिननिमित्त ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदानघुणकीत डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी ! दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - डॉ. अजित कोळेकर; डी. वाय. पाटील साळोखेनगर येथे ‘इन्व्हेंटो २०२६’ उत्साहात कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजराकेआयटीच्या आदित्य साळुंखेस रु.२७.५० लाखाचे पॅकेज; ‘बेट्टी ब्लॉक्स ’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवडडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटीलकोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भाजप काही तालुक्यात स्वतंत्र, तर काही तालुक्यात युती अथवा मैत्रीपूर्ण लढत

schedule21 Jan 26 person by visibility 503 categoryराजकीय

जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून ४१ जणांना उमेदवारी, तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार

कोल्हापूर  : भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाईल. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

करवीर तालुक्यातील दक्षिण विभागात आणि राधानगरी तालुक्यात भाजप स्वतंत्र लढणार आहेत. याशिवाय गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. गगनबावडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झालीय. पन्हाळा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असून, जनसुराज्य शक्ती पक्षाशी मैत्रीपूर्ण लढत होईल. तर शाहूवाडी तालुक्यात भाजप आणि जनसुराज्य शक्ती यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असेल. हातकणंगले तालुक्यात भाजप-शिवसेना युती आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत करतील. शिरोळमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असून, कागल आणि करवीर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्र असेल. तर भुदरगडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील.

 याशिवाय आजरा आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.  खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes