SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशपत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशालेची विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीकोल्हापुरात रस्त्यांची कामे अपूरी, दर्जेदार नसलेने शहर अभियंता, उपशहर अभियंता यांना कारणे दाखवा नोटीसकोल्हापुरात विनापरवाना उभारलेले फटाका विक्री स्टॉल व्यावसायिकांनी स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा ...सुरेश शिपुरकर, शैलजा साळोखे यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीरडॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनप‌ट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळयातील दागीने चोरी करणाऱ्या आरोपीस अटकनांदणी नाका येथे पत्याचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांकडून 1,94,960/- रुपये किंमतीचा मु‌द्देमाल जप्तराजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा कसबा बावडा शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापुरात मुलाने आईचा वरवंट्याने ठेचून केला खून, दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून मुलाचे दुष्कर्म

schedule15 Oct 25 person by visibility 538 categoryगुन्हे

कोल्हापूर : दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निघृण खून केला.सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून, हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. हा प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात भारतनगरमध्ये घडला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर येथली घरात राहत होते. विजय हा व्यसनी असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे जाऊन राहिल्या आहेत. सेंट्रिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचे काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास देत होता.

आज, बुधवारी सकाळी दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला. त्यानंतर त्यानेच इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून आईचा खून केल्याचे सांगितले तसेच शेजा-यांनाही सांगून तो दारात बसला होता.

 नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी  हल्लेखोर विजय निकम अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes